Navratri 2024: नवरात्रीचा उपवास अनवाणी का केला जातो? काय आहे यामगचं कारण...

Navratri 2024: नवरात्रीचा उपवास अनवाणी का केला जातो? काय आहे यामगचं कारण...

नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करत असताना बरेच लोक अनवाणी उपवास करताना पाहायला मिळतात, हा उपवास अनवाणी का केला जातो जाणून घ्या...
Published by :
Team Lokshahi
Published on

दुर्गेच्या महिमेवर अनेक कथा आपण ऐकूण असाल देवीने नऊ दिवस महिषासुरासोबत युद्ध करून अखेर दहाव्या दिवशी त्याच्या वध केला जो दिवस हिंदू धर्मात दसरा म्हणून ओळखला जातो. तर देवीला अनेक नावांनी ओळखले जाते महिषासुरमर्धिनी, दहिषासुरमर्धिनी, करवीरपुरवासिनी तसेच दुर्गा अशा अनेक नावात देवी दुर्गेची व्याप्ती आहे. गुरुवार ३ ऑक्टोबरला अश्विन शुक्ल प्रतिपदा, शारदीय नवरात्री सुरू होत आहे.

सकाळी ६ वाजून ७ मिनिटे ते ९ वाजून ३० मिनिटापर्यंत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना करता येईल. हे व्रत नवरात्रीपर्यंत चालत असल्यामुळे या व्रताला 'नवरात्री' असं नाव पडले आहे. नवरात्रीमध्ये उपवास केला जातो हे तर सर्वांना माहित आहे. पण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करत असताना बरेच लोक अनवाणी उपवास करताना पाहायला मिळतात, हा उपवास अनवाणी का केला जातो जाणून घ्या...

सप्टेंबरनंतर ऑक्टोबरच्या कालावधीत पावसाळ्यानंतर शरद ऋतू सुरू होतो. या ऋतूमध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात जाणवली जाते. या ऋतूमध्ये सूर्यकिरणांपासून जास्तीत जास्त व्हिटॅमिन डी मिळवला जाते. पावसाळ्यात शरीरात सर्दी-खोकल्याचा त्रास वाढण्याची शक्यता असते. पायातून होणारी ही उष्णता शरीराचे तापमान संतुलित ठेवते आणि शरीरातील थंडी कमी करून उष्णता वाढवते. त्यामुळे या काळात अनवाणी राहणे फायदेशीर मानले जाते. नवरात्रीमध्ये अनवाणी चालण्याने पायांच्या माध्यमातून अ‍ॅक्युप्रेशर थेरपी मिळते. ज्यामुळे रक्त प्रवाह वाढतो ज्यामुळे शरीर दीर्घकाळ निरोगी राहते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com